आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करणार्या गोव्यातील प्रतिभा वेळीप यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक
पणजी, ११ ऑगस्ट (वार्ता.) – ८ ऑगस्टला झालेल्या ‘किसान सन्मान निधी’ देण्याविषयीच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील शेतकरी प्रतिभा वेळीप यांच्याशी ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे वार्तालाप केला. या वेळी पंतप्रधानांनी गोव्यात शेती करण्याविषयीचे विविध पैलू जाणून घेतले, तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणार्या प्रतिभा वेळीप यांचे कौतुक केले.