गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही होणार
पणजी, ११ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. एन्.ए.ए.सी.विषयी (‘नॅशनल ॲसेसमेंट ॲण्ड ॲक्रिडेशन काऊन्सिल’विषयी) माहिती देण्याच्या एका कार्यशाळेच्या वेळी ते म्हणाले, ‘‘नवीन शैक्षणिक धोरणाचा लाभ पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे.’’