सातारा जिल्ह्याच्या कोरोना पॉझिटिव्हीटी रेटमध्ये चढउतार !
सातारा, ११ ऑगस्ट (वार्ता.) – गत २४ तासात सातारा जिल्ह्यात ८२७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. प्रतिदिन ११ सहस्र कोरोना चाचण्या केल्या जात आहेत; मात्र ९ ऑगस्ट या दिवशी आढळून आलेला पॉझिटिव्हीटी रेट हा ७ ऑगस्टहून १.७६ टक्के अधिक आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ७.३५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याच्या प्रमाणात चढउतार पहायला मिळत आहे. पॉझिटिव्हीटी रेटनुसार जिल्ह्यातील दळणवळण बंदीविषयीचा निर्णय घेतला जात असल्यामुळे पॉझिटिव्हीटी रेटअल्पअधिक होणे ही जिल्हावासियांच्या दृष्टीने चिंतेची गोष्ट आहे.
९ ऑगस्ट या दिवशी जिल्ह्यात १९८ लसीकरण केंद्रांवर १६ सहस्र ७३३ जणांनी लस घेतली. त्यामध्ये १७६ शासकीय, तर २२ खासगी लसीकरण केंद्रे आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १३ लाख ८८ सहस्र ८३७ जणांनी लसीचा डोस घेतला आहे. पहिला डोस घेणार्यांची संख्या ९ लाखांहून अधिक असून दुसरा डोस घेणार्यांची संख्या ४ लाखांहून अधिक आहे.