महावितरणचे अनुमाने साडेदहा सहस्र धनादेश दरमहा परत येत असल्याने (बाउन्स होण्याने) महावितरणच्या अडचणीत वाढ !
पुणे – दळणवळण बंदीमध्ये महावितरणच्या वीजदेयकांची थकबाकी वाढल्याने आधीच अडचणीत असलेल्या महावितरणला आणखी एका संकटाला सामोरे जावे लागत आहे. देयक भरण्यासाठी ग्राहकांकडून जमा केलेले धनादेश परत येण्याचे (बाऊन्स होण्याचे) प्रमाण वाढले आहे. दरमहा दहा ते साडे दहा सहस्र धनादेश विविध कारणांनी परत येत आहेत. अशा वीजदेयकांसाठी विलंब आकारणी आणि जी.एस्.टी.सह ८८५ रुपयांचा दंड आकारला जात आहे. हा दंड पुढील वीजदेयकात इतर आकार म्हणून समाविष्टही केला जात आहे. धनादेश बँकेतून परत येण्यात पुणे आणि भांडुप परिमंडलातून प्रतिमास १७०० ग्राहक, नागपूर १०० आणि बारामती परिमंडलातून अंदाजे ९०० धनादेश परत येत आहेत.
दरमहा १० हजारांवर ‘चेक बाउन्स’ #MTPune @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @shree_brahmeMT @siddharthkMT @Parthajosh @SurendraDolMT pic.twitter.com/JFvAHJQ8Z8
— MaharashtraTimesPune (@Matapune) August 6, 2021