यवतमाळ येथे प्रतिदिन १५० पोती स्वस्त धान्य तांदूळ काळ्या बाजारात विकला जातो !

यवतमाळ, ११ ऑगस्ट (वार्ता.) – गरिबांसाठी २ रु. प्रतिकिलो येणारा तांदूळ प्रतिदिन १५० पोती इतक्या प्रमाणात काळ्या बाजारात विकला जातो. ‘काल्या’ नावाचा काळाबाजारी संपूर्ण विदर्भात पोलिसांच्या नाेंदीत आहे. त्याच्यावर ५० हून अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याचा माल पोलिसांनी पकडला, तर वरिष्ठांनी संपर्क केल्यास माल सोडून देण्यात येतो. (कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! यावरून भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हे लक्षात येते. – संपादक)