जत शहराच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देऊ ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
कोल्हापूर, ११ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे आणि कार्यकर्ते यांनी नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन जत शहराच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याविषयी निवेदन दिले. यावर राजेश क्षीरसागर यांनी ‘जत शहराच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देऊ’, असे आश्वासन दिले. या संदर्भात दिनकर पतंगे म्हणाले, ‘‘या निधीमधून जत शहरातील अंतर्गत रस्ते, रस्त्यांवरील दिवे, महिलांसाठी शौचालय, बंदिस्त गटारी, विस्तारित क्षेत्रात विविध विकासाची कामे, कामगार भवन कलाकार अशी कामे करण्ो शक्य होणार आहे. त्यामुळे तालुक्यात एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.’’