पुणे जिल्ह्यातील ७९ गावांना ‘झिका’ विषाणूचा संसर्ग !
पुणे, ११ ऑगस्ट – जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये ‘झिका’ विषाणूचा रुग्ण सापडला आहे. आता बेलसरच्या आजूबाजूच्या ७९ गावांमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गावांतील लोक आणि अधिकारी यांना सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच स्थानिक प्रशासन अन् सर्व ग्रामपंचायतींना काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले असून गावांची सूचीही घोषित केली आहे. संशयित १८ लोकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले असून अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही.