सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे १०८ नवीन रुग्ण : ६ जणांचा मृत्यू
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात १० ऑगस्टला कोरोनाचे १०८ नवीन रुग्ण आढळले, तर ६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २७३ एवढी झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४९ सहस्र ५०७ झाली आहे. सद्य:स्थितीत २ सहस्र ५८ रुग्णांवर उपचार चालू आहेत.