अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ पुरस्कार प्रदान !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी गंगा नदीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानानिमित्त त्यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये माजी निवडणूक आयुक्त टी.एस्. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम ‘ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटेलेक्चुअल’ या संस्थेने आयोजित केला होता. याप्रसंगी अधिवक्ता गुप्ता यांना नेहमी साहाय्य करणार्या आणि प्रोत्साहन देणार्या त्यांच्या धर्मपत्नी अन् अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ अधिवक्त्या (सौ.) सरिता गुप्ता याही उपस्थित होत्या. अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी एका संशोधनाच्या आधारे ‘गंगाजलाच्या माध्यमातून कोरोनावर उपचार करणे शक्य आहे’, असा दावा केला होता. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिकाही प्रविष्ट केली होती.