पाणी पितांना पाण्याला सुगंध येत असल्याविषयी देवद आश्रमातील श्रीमती कमलिनी कुंडले यांना आलेली अनुभूती !
१. प्रसाद ग्रहण करतांना पिण्याच्या पाण्याला सुगंध येत असल्याचे लक्षात येणे
‘मला आध्यात्मिक त्रास असल्याने मी खोलीतच होते. २.२.२०२० या दिवशी मी सकाळी ११.१५ वाजता नेहमीप्रमाणे प्रार्थना करून प्रसाद (न्याहारी) ग्रहण करू लागले. पहिले ४ घास खाऊन झाल्यावर मी पाणी प्यायले. तेव्हा मला काहीतरी वेगळे जाणवले; परंतु काय, ते मला कळले नाही. मी पुन्हा ४ घास खाऊन पाणी प्यायले. तेव्हा लक्षात आले की, मी पित असलेल्या पेल्यातील पाण्याला सुगंध येत आहे.
२. पाणी भरून आणलेल्या दोन्ही बाटल्यांची पडताळणी केल्यावर त्यांना सुगंध येत नसल्याचे जाणवणे
नंतर मला ‘खोलीतील पिण्याच्या पाण्याच्या दोन्ही बाटल्या पडताळून पहायला पाहिजेत’, असे वाटले. त्याप्रमाणे मी लगेच माझ्या पाण्याच्या बाटल्या पडताळल्या; परंतु त्यांना सुगंध येत नव्हता. त्यामुळे सुगंध येणार्या पाण्याची माझ्या व्यतिरिक्त अन्य कुणी जाणकाराने पडताळणी केली पाहिजे; म्हणून मी तो उरलेल्या पाण्याचा पेला तसाच ठेवून दिला आणि न्याहारी झाल्यानंतर लगेच श्री. विनायक आगवेकर यांना भ्रमणभाष करून सर्व सांगितले.
३. श्री. विनायक आगवेकर यांनाही पाण्याला सुगंध येत असल्याचे जाणवणे
श्री. विनायकदादांनी खोलीत येऊन त्या सुगंधित पाण्याची पडताळणी केली. त्यांनीही ‘‘पाण्याला सुगंध येत आहे’’, असे सांगितले. त्यांनी वेगळ्या प्रकारे पडताळणी करण्यासाठी ते पाणी दुसर्या ग्लासात ओतून ठेवले. त्यांनी तो मूळचा रिकामा ग्लास आणि त्यानंतर पाणी ओतलेला दुसरा ग्लास, असे दोन्ही ग्लास दुसर्या दिवशी पडताळणी करण्यासाठी वेगळे ठेवण्यास सांगितले.
४. पेल्यातील पाण्याला येणारा सुगंध वैशिष्ट्यपूर्ण असल्याने ते जतन करण्यासाठी पाठवणे
त्याप्रमाणे दुसर्या दिवशी (३.२.२०२०) संध्याकाळी ७.१५ वाजता मी पाण्याची पडताळणी केली आणि मला त्या दुसर्या ग्लासातील पाण्याला सुगंध येत असल्याचे आढळले. मी हे विनायकदादांना सांगितल्यावर त्यांनी ते पाणी एका बाटलीत घालून रामनाथी आश्रमात जतन करण्यासाठी पाठवण्यास सांगितले. (त्याप्रमाणे ते रामनाथी आश्रमात पाठवले.)’
– श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.२.२०२०)
(या पाण्याला मोगर्याच्या फुलाला येतो तसा सुगंध येत होता. – कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी गोवा.)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |