इसिसचा आतंकवादी मूळचा हिंदु असल्याचे ‘एन्.आय.ए.’च्या चौकशीत उघड !
स्वामी विवेकानंद यांनी ‘जेव्हा एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होण्यासह एक शत्रू वाढतो’, असे सांगितले होते. त्याचीच ही प्रचीती म्हणावी लागेल ! – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) ४ ऑगस्ट या दिवशी जम्मू-काश्मीर, मंगळुरू आणि बेंगळुरू या ठिकाणी धाडी टाकल्या. ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेच्या संदर्भात केलेल्या या कारवाईमध्ये ४ संशयितांना अटक करण्यात आली. यात बेंगळुरूच्या शंकर व्यंकटेश पेरुमल उपाख्य अली महविया या संशयिताचाही समावेश आहे. यातील शंकर पेरुमल हा पूर्वी हिंदु असल्याचे एन्.आय.ए.च्या चौकशीत समोर आले आहे.
१. शंकर पेरुमल (वय २३ वर्षे) हा मूळचा हिंदु असून त्याचे खरे नाव ‘मादेश’ असे आहे. मादेशने काही वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर तो ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेमध्ये सक्रीय झाला, असे एन्.आय.ए.च्या चौकशीत उघड झाले आहे.
२. चेन्नईच्या एका मुसलमान शाळेमध्ये शिकत असतांना मादेश इस्लाम धर्माकडे आकर्षित झाला होता. मध्यंतरी मादेशचे आई-वडील घटस्फोट घेऊन विभक्त झाले. त्यानंतर तो विदेशातील आतंकवाद्यांच्या संपर्कात आला.