आजपासून लोकल प्रवासासाठी रेल्वेस्थानकांवर ‘ऑफलाईन’ पास उपलब्ध !
मुंबई – मुंबईत लोकलमधून प्रवास करता येण्यासाठी लागणारा पास देण्याची ‘ऑफलाईन’ प्रकिया ११ ऑगस्टपासून चालू करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील ५३ रेल्वेस्थानकांवर ३५८ साहाय्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पास मिळण्यासाठी कोरोनाचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि २ छायाचित्रे आवश्यक असणार आहेत. सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत हे कक्ष चालू ठेवण्यात येणार आहेत. कोरोनावरील डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बनावट असल्यास त्याविषयी कठोर कारवाई करण्याची चेतावणी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.