१७ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड
मुंबई – १७ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा चालू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आयुक्त, तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
त्या म्हणाल्या, ‘‘कोरोनाविषयी पूर्ण काळजी घेऊनच शाळा चालू करण्यात येणार आहेत. शिक्षकांनी कोरोनावरील दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतर शाळेत जाण्याची अट ठेवण्यात आली आहे, तसेच ‘आरटीपीसीआर’ चाचणी अत्यावश्यक करण्यात आली आहे.’’