पुणे जिल्ह्यातील उपसा सिंचन विभागातील उपअभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !
लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक
इंदापूर (पुणे), १० ऑगस्ट – इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील उपसा सिंचन विभागातील उपअभियंता संजय मेटे आणि पोपट शिंदे यांनी आपल्याच कार्यालयातील संजय पवार यांच्या औषधांची देयके संमत करण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई ८ ऑगस्ट या दिवशी बारामती येथील संघवीनगरमध्ये करण्यात आली. या प्रकरणी संजय पवार यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. पैसे देण्यास प्रोत्साहन देऊन गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केल्याविषयी न्यायालयीन तक्रार दिली आहे.