पुणे जिल्ह्यातील मास्क न लावणार्यांकडून ४३ कोटी रुपयांचा दंड वसूल !
कोरोना महामारीच्या कालावधीतही नियम न पाळणारे केवळ पुणे जिल्ह्यात लाखो लोक असणे हे शासनकर्त्यांनी समाजाला शिस्त न लावल्याचेच द्योतक आहे. आतातरी समाजाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणार का ?- संपादक
पुणे, १० ऑगस्ट – कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळातही मास्क न लावणार्या जिल्ह्यातील अनुमाने ९ लाख ५० सहस्रांहून अधिक नागरिकांकडून ४३ कोटी ४८ लाख २ सहस्र ११३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक म्हणजे ५ लाख ५९ सहस्र ३६० पुणेकरांचा समावेश आहे. ही मागील १६ मासांतील दंडात्मक कारवाई आहे.