मराठा आरक्षणासाठी पुढील मूक आंदोलन नांदेड येथे होणार ! – संभाजीराजे, भाजप खासदार
पुणे – मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणारे भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून होत असलेल्या विलंबाविषयी खेद व्यक्त करत पुन्हा एकदा लढा चालू करण्याची चेतावणी दिली आहे. आता पुढील मूक आंदोलन २० ऑगस्ट या दिवशी नांदेड येथे होणार आहे, असे संभाजीराजेंनी ९ ऑगस्ट या दिवशी झालेल्या पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये सांगितले. ‘आपण ही लढाई संयमाने लढत असून २ मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो; पण आपल्याला तसे करायचे नाही’, असेही त्यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणाही त्यांनी केली.