ना‘पाक’ जिहाद !
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यात असलेल्या भोंग शहरामध्ये ४ ऑगस्ट या दिवशी शेकडो जिहाद्यांनी तेथील गणपति मंदिरावर आक्रमण करत हिंदु देवतांच्या मूर्तींची नासधूस केली. याचा जगभरात ‘व्हायरल’ (मोठ्या प्रमाणात प्रसारित) झालेला व्हिडिओ पाहिल्यावर महंमद घोरी, तुघलक, अकबर, औरंगजेब, टिपू सुलतान यांसारख्या क्रूर म्लेंच्छ आक्रमकांच्या काळाची आठवण होते. त्या काळात हिंदूंच्या मंदिरांचा कशा प्रकारे नायनाट करण्यात आला असेल, त्याचे हा व्हिडिओ म्हणजे जिवंत प्रमाण आहे. अर्थात् या घटनेनंतर पाकिस्तानमधील विविध नेत्यांनी त्याचा निषेध केला. मूळ समस्येवर तोडगा काढण्याचा विचार करता विरोधाच्या ठरावास तसा काही अर्थ नसतांना खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या विधानसभेने निषेधाचा ठराव संमत केला. शरीयत कायद्याला सर्वतोपरी राजाश्रय असलेल्या पाकिस्तानात असे घडणे, तरीही नसे थोडके ! पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत: या आक्रमणाची नोंद घेत संबंधित धर्मांध आणि धर्मांधांच्या विरोधात कारवाई करण्यात कुचराई करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
बोलाची कढी आणि बोलाचा भात !
या सर्वांतच या आक्रमणामागील कारण म्हणजे एक ८ वर्षीय हिंदु मुलगा असल्याची बातमी आता समोर आली आहे. त्याच्यावर एका मदरशात तेथील गालिच्यावर लघवी केल्याचा आरोप असून तेथे इस्लामचे ‘पाक’ (पवित्र) धर्मग्रंथ असल्यामुळे त्या मुलाने म्हणे इस्लामला अपमानित केले ! त्यामुळे त्याच्या विरोधात ईशनिंदा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्याला अटकही झाली. त्याचे लहान वय पहाता एका आठवड्यानंतर त्याला जामीन संमत करण्यात आला. याचा राग धरून पाकिस्तानातील जिहाद्यांनी गणपति मंदिराची नासधूस केली. या घटनेवर जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात असतांना जे लोक ‘सर्वत्र इस्लामचे राज्य यावे’, यासाठी स्वत:च्या लहान मुलांना ‘मानवी बॉम्ब’ बनवण्यात धन्यता मानतात नि त्यासाठी त्यांचा बळी देतात, त्यांच्याकडून या निष्पाप आणि निष्कपट हिंदु मुलाला समूजन घेण्याची अपेक्षा करणे, हे वेडगळपणाचेच ठरेल. जे पंतप्रधान या धर्मांधांच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा करतात, त्यांनी वर्ष २०१८ मध्ये मात्र याच ईशनिंदा कायद्याचे समर्थन करत त्याच्या कठोर कार्यवाहीविषयी आग्रही भूमिका मांडली होती. त्यामुळे यातून त्यांची ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ ही हिंदुद्वेष्टी भूमिका स्पष्ट होते.
पाकचा ईशनिंदेचा कायदा अत्यंत कठोर असून त्यामध्ये अन्य धर्म नव्हे, तर केवळ इस्लाम अथवा महंमद पैगंबर यांचा अपमान झाल्यासच कारवाईची तरतूद आहे. पाक धर्माला ‘नापाक’ करण्याचा प्रयत्न करणार्यांवर वचक बसवण्यासाठी त्यांना देहांत शिक्षा देण्यापर्यंतची सोय या मुसलमानधार्जिण्या कायद्यात आहे. त्यातील जाचक कलमांमुळेच पंजाब प्रांतातील या हिंदु मुलास अटक करण्यात आली. ईशनिंदेची आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आतंकवादविरोधी पथकातील ३० वर्षीय तैमूर रजा याला काही वर्षांपूर्वी फेसबूकवरून इस्लामला अपमानित करण्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ईशनिंदेच्या कायद्यामुळे वर्ष २००९ मध्ये प्रकाशझोतात आलेली आसिया बीबी हिने म्हणे महंमद पैगंबर यांच्याविरोधात अपशब्द बोलल्याने तिला देहांत शिक्षा सुनावण्यात आली. सध्या तिने कॅनडामध्ये आश्रय घेतला आहे. या कठोर कायद्यांतर्गत अनेक लोक अटकेत आहेत; परंतु अद्याप तरी कुणाला फाशी देण्यात आलेली नाही, ही वेगळी गोष्ट !
जमाव हत्या !
या काळ्या कायद्याचा पाकिस्तानी समाजावर वचक असला, तरी या कायद्यातून सुटका झालेल्यांची देशातील जिहाद्यांपासून मात्र कधीच सुटका होत नाही. काही वर्षांपूर्वी उत्तर पश्चिम पाकिस्तानातील एका विद्यापिठातील मशाल खान नावाच्या २३ वर्षीय विद्यार्थ्यावर इस्लामचे विडंबन केल्याचा आरोप करत धर्मांध जमावाने त्याची हत्या ( लिंचिंग) केली होती. जून २०१७ मध्ये बलुचिस्तान प्रांतात इस्लामचा अपमान करणार्या अटकेतील व्यक्तीला धर्मांधांच्या हवाले करण्याच्या मागणीसाठी झालेल्या हिंसेमध्ये एका १० वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. ‘गार्डियन’ या इंग्लंडच्या वृत्तपत्रानुसार वर्ष १९९० ते २०१७ या कालावधीत जमावाने अशा प्रकारे ६७ लोकांची हत्या केली आहे. हा अधिकृत आकडा असून शरीयतच्या रक्षणासाठी काहीही करायला सिद्ध असणार्या पाक सरकारने अशा हत्येची किती प्रकरणे लपवली असतील, हे देवालाच ठाऊक आहे, हेही तितकेच खरे आहे.
ज्या ८ वर्षीय मुलाचे कारण देत गणपति मंदिर नष्ट करण्यात आले, त्या मुलाच्या कुटुंबाला सध्या पोलीस संरक्षणात ठेवण्यात आले आहे तसेच अन्य साधारण १५० हिंदु कुटुंबे यांनी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी भोंग शहरातून पलायन केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान हिंदु परिषद, तसेच पाकमधील अल्पसंख्यांक मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी याविषयी चिंता व्यक्त केली असून ‘पाकच्या पंजाब प्रांतात याआधी मोठ्या प्रमाणात हिंदू होते. आता केवळ रहीम यार खान या जिल्ह्यापुरतेच ते सीमित राहिले आहेत’, अशा आशयाच्या ट्वीट्स केल्या आहेत. पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंचा सातत्यपूर्ण पद्धतीने नायनाट केला जात असतांना काही वर्षांतच ते औषधालाही रहाणार नाहीत. ही सर्व परिस्थिती पहाता जर एखाद्याने पोटतिडकीने मागणी केली की, भारतातील सर्व अल्पसंख्यांकांनी पाकिस्तानात चालते व्हावे आणि पाकिस्तान, बांगलादेश येथील सर्व हिंदु बांधवांना भारताने कायमस्वरूपी आश्रय द्यावा, तर मानवीय भावनांचा विचार करता त्याची मागणी चुकीची असल्याचे अभावानेच कुणी म्हणेल. तसेही पाकला ‘नापाक’ करणारी जिहादी विचारधारा नष्ट करून अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना हाच हिंदूंना स्वाभिमानाने जगण्यासाठीचा एकमेव पर्याय आहे, हे लक्षात घ्या !