५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चंद्रपूर येथील कु. आर्या सचिन कुळकर्णी (वय ९ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आर्या सचिन कुळकर्णी ही एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु डॉ. आठवले) |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
आषाढ कृष्ण पक्ष सप्तमी (३०.७.२०२१) या दिवशी चंद्रपूर येथील कु. आर्या सचिन कुळकर्णी हिचा ९ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी जाणवलेले सूत्र आणि तिची आई अन् साधक यांना तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी
नामजप करतांना आणि देवांच्या कथा वाचतांना ‘गर्भ आतून प्रतिसाद देत आहे’, असे आईला जाणवणे : ‘आर्याच्या वेळी गर्भवती असतांना आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) मला ३ मास विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्या ३ मासांत मी सनातनच्या ग्रंथांचे वाचन केले. मी प्रतिदिन मनाचे श्लोक वाचत असे आणि कुलदेवीचा (श्री रेणुकादेवीचा) नामजप करत असे. मी देवांच्या कथा वाचायचे. तेव्हा ‘गर्भ आतून प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवायचे.
२. जन्मानंतर
आर्या जन्मतःच फार गोंडस होती. तिच्याकडे बघून सर्वांना ‘रेणुकादेवीच आली आहे’, असे वाटायचे.
३. वय १ ते ५ वर्षे
अ. तिला सर्वांमध्ये मिळूनमिसळून रहायला आवडते.
आ. तिला नृत्य करायला आवडते.
इ. ती २ वेण्या घालून आणि कुंकू लावून शाळेत जाते.’
– सौ. राधिका कुळकर्णी (आई), चंद्रपूर (८.११.२०२०)
४. वय ५ ते ९ वर्षे
४ अ. ‘आर्या हसतमुख आहे. तिच्याकडे पाहिल्यावर शांत वाटते आणि आनंद जाणवतो. तिचे बोलणे मधुर आणि नम्र आहे.’ – सौ. मंगला दर्वे, चंद्रपूर (नोव्हेंबर २०२०)
४ आ. ‘तिचा तोंडवळा देवीसारखा सुंदर आणि सात्त्विक आहे.’ – सौ. सुषमा चंदनखेडे, चंद्रपूर आणि सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर, वर्धा (नोव्हेंबर २०२०)
४ इ. ‘आर्याचे डोळे बोलके असून त्यांमध्ये ईश्वराप्रती भाव जाणवतो.’ – सौ. सत्याली देव, चंद्रपूर (नोव्हेंबर २०२०)
४ ई. ‘तिच्या छायाचित्राकडे पाहून आनंद जाणवतो.’
– श्रीमती मनीषा ठेंगरे, गडचिरोली
४ उ. देवाची आवड : ‘आर्या प्रतिदिन प्रार्थना आणि नामजप करते. ती दुचाकीवर बसतांना आठवणीने प्रार्थना करते. बाहेर जातांना वाटेत मंदिर दिसले की, ती थांबून प्रार्थना करते. तिला मंदिरात जायला आवडते. तिला बरे वाटत नसेल, तेव्हा ती स्वतःहून कुलदेवीचा नामजप करते.
४ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची ओढ : आर्या नेहमी तिच्या आजीला (सौ. संध्या कुळकर्णी यांना) विचारते, ‘‘आपण गोव्याला गेलो, तर प.पू. गुरुदेव आपल्याला भेटतील का ?’’ ‘तिला प.पू. गुरुदेवांना भेटण्याची आतून ओढ आहे’, असे जाणवते.
५. स्वभावदोष : हट्टीपणा
– सौ. राधिका कुळकर्णी (८.११.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |