अशा सद्गुरुचरणी आमचे कर कोटी जुळती ।
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी ५४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कोटी कोटी प्रणाम !
ऋषितुल्य ब्राह्मतेजाची ।
ज्ञानमय तेजस्वी मूर्ती ।। १ ।।
सनातन धर्मराज्य स्थापण्यासी ।
मिळते क्षात्रतेजाची स्फूर्ती ।। २ ।।
चैतन्यमय वाणी ।
मंत्रमुग्ध जनांसी करितसे ।। ३ ।।
साधनेसी प्रवृत्त करोनी ।
त्रिखंडात गुरुकार्याची कीर्ती करिती ।। ४ ।।
चैतन्यमय बोल ज्यांचे भिडती हृदयास साधकांच्या ।
पारखूनी आम्हांस साधनेत घडविती ।। ५ ।।
पितृतुल्य तुम्ही मातृप्रीतीही दाविता ।
कर करकमलाने धरोनी, गुरुचरणी आम्हा अर्पिता ।। ६ ।।
शांत आणि स्थितप्रज्ञ असती ।
गुरुचरणी समर्पित वैराग्यमूर्ती ।। ७ ।।
ज्ञान, भक्ती, वैराग्याचा त्रिवेणी संगम येथे ।
अशा सद्गुरुचरणी आमचे कर कोटी जुळती ।। ८ ।।
– प्रसिद्धी कक्ष, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |