लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ हवा ! – साध्वी डॉ. प्राची, हिंदुत्वनिष्ठ नेत्या
लोकसंख्या नियंत्रण कायदा होण्यासाठी मी गेल्या २० वर्षांपासून लढाई लढत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात केवळ ऑक्सिजन न मिळाल्याने कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जणांचा खाटा न मिळाल्याने, तर काही जणांचा आधुनिक वैद्य (डॉक्टर) उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाला आहे. लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी लवकरात लवकर ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्यात यावा आणि जे या कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांचा मतदानाचा अधिकार रहित करावा.