भारतातील ८० टक्के समस्यांचे कारण ‘भ्रष्टाचार’ आणि ‘लोकसंख्या विस्फोट’ ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय, नवी देहली

अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय

भारतात देशविरोधी ट्वीट करणे, पोस्ट लिहिणे, ‘वेब सिरीज’ बनवणे यांसह अनेक देशविघातक कारवायांसाठी अन्य देशांतून काळा पैसा पुरवला जात आहे. सनातन धर्मविरोधी आणि हिंदूंची अपकीर्ती करणारे चित्रपट सिद्ध करण्यासाठीही विदेशातून पैसा पुरवला जात आहे. भारतातील ८० टक्के समस्यांचे कारण ‘भ्रष्टाचार’ आणि ‘लोकसंख्या विस्फोट’ हे आहेत. हिंदु धर्मालाही या कारणांपासून मोठा धोका आहे. त्यामुळे या दोन्हींसाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे.