तळमळीने सेवा करणार्या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया ढोबळे !
तळमळीने सेवा करणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या जुन्नर, पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया मारुती ढोबळे (वय ४५ वर्षे) !
१. नम्र
‘सौ. छायाताई कधीच मोठ्या आवाजात बोलत नाही. तिच्याकडून ‘साधक दुखावला’, असे आजपर्यंत झाले नाही. ती इतरांचे म्हणणे ऐकून घेते.
२. छायाताईची वेशभूषा नेहमी सात्त्विक असते.
३. व्यष्टी साधना गांभीर्याने करणे
ती व्यष्टी साधना परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते, तसेच ती व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांचा आढावाही परिपूर्ण देते. त्यामध्ये सातत्य असते. ती तिच्याकडून झालेल्या चुका व्यष्टी आढाव्यात प्रांजळपणे सांगते.’
– सौ. स्मिता बोरकर (६२ टक्के आध्यात्मिक पातळी), जुन्नर, पुणे.
४. समष्टी सेवेची तळमळ
४ अ. ‘छायाताईंना समष्टी सेवा करण्याची पुष्कळ तळमळ आहे. त्या नोकरीच्या ठिकाणीही समष्टी सेवा करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात.’
– कु. वैभवी सुनील भोवर (६८ टक्के आध्यात्मिक पातळी), पुणे
४ आ. ग्रंथ सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी संकलित केलेले ग्रंथ घरोघरी पोचावेत. त्यांतील ज्ञान आणि चैतन्य यांचा सर्वांना लाभ व्हावा. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वांनी धर्माचरण करावे’, यासाठी ती तळमळीने प्रयत्न करते. जिज्ञासू, नातेवाईक आणि सहकारी यांना ग्रंथांचे महत्त्व सांगून ते सर्वांपर्यंत पोचवण्याची तिची धडपड असते.
५. परिपूर्ण सेवा करणे
ताई दायित्व घेऊन सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती सेवा करतांना येणार्या अडचणी विचारून घेते.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
अ. तिला कोरोनाची चाचणी करायला सांगितली होती. त्या वेळी तिने तिच्या समवेत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथ नेला. तिचा चाचणीचा अहवाल नकारात्मक आला. माझ्यावर आलेली संकटे गुरुदेवांच्या कृपेने दूर झाली’, असा तिचा भाव होता.’
– सौ. स्मिता बोरकर
आ. ‘समष्टी सेवेत केलेले प्रयत्न सत्संगात सांगतांना त्यांच्यात अहंचा भाग कधीच जाणवत नाही. त्या ‘गुरुदेव माझ्याकडून कसे करवून घेतात ?’, या भावाने सूत्रे सांगतात आणि त्या वेळी त्यांची भावजागृतीही होते.’
– कु. वैभवी सुनील भोवर
७. जाणवलेले पालट
अ. ‘पूर्वी तिच्यामध्ये ‘पुढाकार न घेणे’ हा स्वभावदोष होता. तिला त्याची जाणीव करून दिल्यावर तिने तो स्वभावदोष दूर होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले. आता ती प्रवचने घेण्याची सेवा पुढाकार घेऊन आणि भावपूर्ण करते.
आ. तिच्याकडून कुटुंबियांच्या संदर्भात होणार्या चुकांची तिला जाणीव करून दिल्यावर त्यामध्येही पालट झाला आहे.
इ. आता तिच्यातील ‘साधकांना समजून घेणे आणि त्यांना साहाय्य करणे’ या गुणांमध्ये वाढ झाली आहे.’
– सौ. स्मिता बोरकर
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |