सर्व गोमंतकियांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर हा आता अंतिम दिनांक
पणजी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेण्यासाठी शासनाने प्रथम ३१ जुलै २०२१ हे ध्येय ठेवले होते; मात्र हे ध्येय साध्य होऊ न शकल्याने शासनाने आता यात पालट करून ३१ ऑक्टोबर हा नवीन अंतिम दिनांक निश्चित केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या एका सभेत बोलतांना ही माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील ९० टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीची पहिला मात्रा घेतली आहे.’’