गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची केरळमध्ये एका चर्चमधील शोकसभेला उपस्थिती
पणजी – गोव्याचे राज्यपाल तथा भाजपचे केरळ विभागाचे माजी प्रमुख पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी केरळमधील देवलोकम् येथे मल्लंकारा ऑर्थाेडॉक्स सिरीयन चर्चच्या मुख्यालयातील एका शोकसभेला उपस्थिती लावली.
देवलोकम् येथील मल्लंकारा ऑर्थाेडॉक्स सिरीयन चर्चच्या मुख्यालयात कॅथॉलिक्स बासिलीयोस मार्थाेमा पावलोस-२ यांच्या निधनावरून ६ ऑगस्ट या दिवशी एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ‘या शोकसभेला उपस्थिती लावल्यास ते अयोग्य होईल’, असे केरळ राज्यातील कोट्ययाम जिल्ह्याच्या पोलिसांनी गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी कळवले होते.