‘भारत माता की जय संघा’च्या गोवा विभागाच्या वतीने गोव्यात ठिकठिकाणी ब्रिटीशकालीन कायद्यांच्या प्रतीची होळी
पणजी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – देहली येथे ८ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ‘भारत बचाव आंदोलना’च्या समर्थनार्थ ‘भारत माता की जय संघा’च्या गोवा विभागाच्या वतीने गोव्यात डिचोली, म्हापसा आदी ठिकाणी धरणे आंदोलन करून ब्रिटीशकालीन कायद्यांच्या प्रतीची होळी करण्यात आली.
देशविघातक ब्रिटीशकालीन कायदे रहित करून समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, घुसखोरी नियंत्रण कायदा, धर्मांतर नियंत्रण कायदा आणि समान शिक्षण कायदा, हे देशाच्या हिताचे ५ कायदे अस्तित्वात आणण्याच्या मागणीसाठी ‘भारत बचाव आंदोलना’च्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी देहली येथे आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘भारत माता की जय संघा’च्या गोवा विभागाच्या वतीने गोव्यात धरणे आंदोलन करण्यात आले. समान नागरी कायदा गोव्यात अस्तित्वात आहे; मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.