सातारा शहरातील गडकर आळी येथे घरफोडी !


सातारा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील गडकर आळी येथील शिवदर्शन वसाहतीमधील मंगलमूर्ती रेसिडन्सी येथे विनायक अशोक जाधव यांच्या बंद घराचे कडीकोयंडे उचकटून चोरट्यांनी ११ सहस्र रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. २० जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या घराच्या छतावरील (टेरेसवरील) दरवाजाचे कडीकोयंडे उचकटून चोरांनी घरात प्रवेश केला आहे. या घटनेविषयी शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.