यवतमाळ जिल्ह्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचे संकट !
पिकांवरील संकट म्हणजे आपत्काळाला प्रारंभ झाल्याचेच द्योतक ! – संपादक
यवतमाळ, ८ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्ह्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढत आहे. याची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाचे पथक जिल्ह्यात आले आहे. कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर आणि सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार यांच्या पथकाने केलेल्या पडताळणीत बोंडअळीची उपद्रवकारकता जाणून त्यावर शेतात ‘फेरोमन ट्रॅप’ बसवण्याची सूचना केली आहे. कापसाचे बोंडे सिद्ध होण्यापूर्वीच बोंडअळी आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.