आपत्काळापूर्वी सिद्धतेसाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
आतापर्यंतच्या धार्मिक इतिहासावरून लक्षात येते की, साधना केल्याने सर्वकाही साध्य करता येते. भारतात व्यापक हिंदूसंघटन करून सर्व स्तरांवर लढण्यासाठी सिद्धता करणे आवश्यक आहे. भारताकडे धर्माची न्याय्य बाजू असल्याने अल्प सैन्य आणि साधनसामग्री असतांनाही श्रीराम, श्रीकृष्ण, आर्य चाणक्य अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धे जिंकली आहेत, हे भारताहून वरचढ असलेल्या चीनने लक्षात घ्यायला हवे. आपत्काळाला प्रारंभ होण्यापूर्वी सिद्धतेसाठी मिळालेल्या या वेळेचा नेमकेपणाने सदुपयोग करायला हवा.