साप्ताहिक आणि पाक्षिक ‘सनातन प्रभात’ यांमध्ये प्रकाशित होणारे लिखाण आता संकेतस्थळाच्या एकाच ‘लिंक’वर पहाता येण्याची सुविधा उपलब्ध !
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या संकेतस्थळावर नियतकालिकांत प्रकाशित करण्यात आलेले लिखाण संकेतस्थळाच्या विविध ‘कॅटेगरीज’मध्ये (बातमी/लेख यांच्या प्रकारांमध्ये) विभागण्यात आले आहे. यांमध्ये आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्यस्तरीय/स्थानिक बातम्या, राष्ट्र-धर्म लेख, साधना, अनुभूती आदी विविध ‘कॅटेगरीज’चा समावेश आहे. असे असले, तरी प्रतिदिनचे दैनिक एकाच लिंकवर वाचण्यासाठीची सुविधासुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी संकेतस्थळाच्या मुख्य पानावरील (‘होमपेज’वरील) ‘मेनूबार’मध्ये असलेल्या ‘आजचे दैनिक’ यावर क्लिक केल्यास त्या मार्गिकेवर दैनिकातील सर्व लिखाण ‘पोस्ट्स’च्या रूपात (मथळा आणि संबंधित चित्र यांच्या रूपात) एका खाली एक दिसते. आपल्याला वाचण्यासाठी हव्या असलेल्या ‘पोस्ट’वर क्लिक केल्यास ती बातमी अथवा लेख उघडला जाऊन तो वाचता येऊ शकतो. पुढील बातमी अथवा लेख वाचण्यासाठी ‘बॅक’ (मागे जा) दाबून ‘आजचे दैनिक’च्या मार्गिकेवर आपण परत येतो. तेथे आपल्याला हवी असलेली बातमी/लेख यांवर क्लिक केल्यास ती बातमी/लेख ओपन होऊन ते वाचू शकतो. या माध्यमातून वाचकांना ‘ऑनलाईन’ दैनिक एकाच मार्गिकेवर वाचण्याची सोय आधीपासून उपलब्ध आहे.
दैनिकातील लिखाण एकाच ठिकाणी वाचण्यासाठीची मार्गिका
https://sanatanprabhat.org/marathi/todays-dainik
आतापर्यंत मराठी दैनिकापुरती असलेली ही सुविधा आता कन्नड साप्ताहिक, तसेच हिंदी आणि इंग्रजी पाक्षिक यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील मार्गिकांवर त्या-त्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले लिखाण आपल्याला वाचायला मिळणार आहे :
कन्नड साप्ताहिक : https://sanatanprabhat.org/kannada/weekly
हिंदी पाक्षिक : https://sanatanprabhat.org/hindi/fortnightly
इंग्रजी पाक्षिक : https://sanatanprabhat.org/english/fortnightly
या मार्गिकांवर ते लिखाण पोस्ट्सच्या रूपात दिसेल. या पोस्ट्स कन्नड साप्ताहिकाच्या मार्गिकेवर एक आठवडा, तर हिंदी आणि इंग्रजी पाक्षिक यांच्या मार्गिकांवर पूर्ण पंधरवडा दिसत राहील. तो वाचण्यासाठीही ‘आजचे दैनिक’ वाचण्यासाठीची जी पद्धत वर उल्लेखण्यात आली आहे, ती अवलंबावी. त्या-त्या भाषेतील मार्गिकांना त्यांच्या मुख्य पानावरील (‘होमपेज’वरील) मेनूबारमध्येही स्थान देण्यात आले आहे. कन्नडमध्ये ‘या आठवड्याचे साप्ताहिक’, तर हिंदी आणि इंग्रजी यांमध्ये अनुक्रमे ‘नूतन पाक्षिक’ आणि ‘Latest Fortnightly’ असे लिहिण्यात आले आहे.
सर्व साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आदींनी या सुविधेचा अवश्य उपयोग करावा, ही विनंती.