मालगाव (जिल्हा सातारा) येथील २ मद्यसाठ्यांवर पोलिसांच्या धाडी !
सातारा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा तालुका पोलिसांनी मालगाव येथे २ ठिकाणी मद्यसाठ्यांवर धाडी टाकल्या. मालगाव येथील बसडेपोच्या बाजूला मद्य विक्री करणारे विक्रम राजेंद्र आवळे यांच्यावर कारवाई करत ८४० रुपयांच्या १४ देशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच मालगाव येथील इंदिरानगर येथे रहाणार्या फरिदा एनाज पटेल या महिलेकडून ६६० रुपयांच्या ११ मद्याच्या बाटल्या कह्यात घेण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोघांवर गुन्हे नोंद केले आहेत.