अटकेला आव्हान देणारी राज कुंद्रा यांची याचिका न्यायालयाने फेटाळली !
मुंबई – अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले उद्योजक राज कुंद्रा यांची त्यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. कुंद्रा यांच्यासह त्यांच्या आस्थापनाचे ‘आयटी’ प्रमुख रायन थॉर्पे यांचीही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. मागील ३ आठवड्यांपासून हे दोघेही कारागृहात आहेत. अन्वेषणात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांची याचिका फेटाळत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.