देहली येथील सनातन सेवाकेंद्रातील कु. पूनम चौधरी यांना रामनाथी आश्रमातील कमलपीठ स्थापनेच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. यज्ञाच्या वेळी ‘सद्गुरु डॉ. पिंगळेकाका रामनाथी आश्रमात प.पू. गुरुदेवांसमोर हात जोडून दास्यभावात उभे आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि गुरुदेवांना ‘सर्व साधकांमध्ये सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्यासारखा दास्यभाव निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना होणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कमलपिठाची पूजा केली. नंतर यज्ञाच्या वेळी ‘सनातनचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या समोर हात जोडून दास्यभावात उभे आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. (त्या वेळी प्रत्यक्षात सद्गुरु पिंगळेकाका उत्तर भारतामध्ये धर्मप्रसाराची सेवा करत होते.) तेव्हा माझ्याकडून गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘आम्हा सर्व साधकांमध्ये सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांसारखा दास्यभाव निर्माण होऊ दे.’ नंतर ‘गुरुदेवांनीच आपल्याला साधनेत आणले. ते सर्व साधकांवर पुष्कळ कृपा करत आहेत. त्यांनीच साधकांचा हात घट्ट पकडून ठेवला आहे’, अशी जाणीव होऊन यज्ञाच्या वेळी संपूर्ण वेळ भरपूर कृतज्ञता वाटत होती.
२. मी कुंडामध्ये कमळे पाहिल्यावर गुरुकृपेने मला ‘ती कमळे नसून तिथे प.पू. गुरुदेवांचे श्रीचरणच आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले.
३. कमलपिठाच्या पूजनानंतर आरतीच्या प्रसंगी ‘सर्व साधक तिन्ही गुरूंची आरती करत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे
कमलपिठाच्या पूजनानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आरती केली. तेव्हा ‘कमलकुंडामध्ये दीप ठेवलेल्या ठिकाणी प.पू. गुरुदेव आहेत अन् त्यांच्या दोन्ही बाजूंना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत अन् सर्व साधक त्यांची आरती करत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
४. कृतज्ञता :
‘दयाळू, कृपाळू आणि भक्तांवर अखंड प्रेम करणारी विष्णुस्वरूप गुरुमाऊली, तसेच साक्षात् श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आम्हा सर्व साधक-जिवांना त्यांच्या छत्रछायेखाली ठेवले आहे’, यासाठी त्यांच्या कोमल चरणी अखंड कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. पूनम चौधरी, सनातन सेवाकेंद्र, देहली. (१८.२.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |