उजनी धरणातील अवैध वाळू उपसा करणार्या ४० लाख रुपयांच्या ५ बोटी उद्ध्वस्त !
अवैध वाळू उपसा करणार्यांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा घटना थांबतील ! – संपादक
इंदापूर (पुणे), ८ ऑगस्ट – इंदापूर येथील उजनी जलाशयामध्ये गस्त घालत असतांना अवैध वाळू उपसा करणार्या ४० लाख रुपयांच्या ४ फायबर बोटी आणि १ सक्शन बोट जिलेटीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखालील फिरत्या गस्ती पथकाने केली आहे. सलग १० दिवसांतील ही तिसरी कारवाई असल्याने अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. धरणात गस्त घालण्यासाठी इंदापूर पोलीस ठाण्याला नवीन स्पीड बोट दिली आहे. या बोटीच्या वापराच्या पहिल्याच दिवशी ही धडक कारवाई करण्यात आली.