देहली आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी
नवी देहली – येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा इ-मेल अल् कायदाच्या एका आतंकवाद्याकडून प्राप्त झाल्याचे एका अधिकार्याने सांगितले. इ-मेलमध्ये लिहिले आहे की, करणबीर सुरी उपाख्य महंमद जलाल आणि त्याची पत्नी शैली शारा उपाख्य हसीना ८ ऑगस्ट या दिवशी सिंगापूरहून भारतात येत आहेत. ते २-३ दिवसांत विमानतळावर बॉम्ब टाकण्याची सिद्धता करणार आहेत.