विश्रांतवाडी (पुणे) येथे रो हाऊससाठी गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !
प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. ते साधनेनेच येते. यासाठी सर्वांनी साधना म्हणून नामजप करायला सुरुवात करणे आवश्यक आहे.
विश्रांतवाडी (पुणे) – येरवडा येथील केटरिंग व्यावसायिक असलेले गणेश लाड यांनी लोहगाव येथे रो हाऊस (ऐकावर ऐक बांधकाम केलेले घर) घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे पैसे गुंतवले होते. गेली अनेक वर्षे रो हाऊस किंवा पैसे परत न मिळाल्याच्या तणावातून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे, मात्र बांधकाम व्यावसायिकाने पैसे देण्याचे मान्य केल्याने नातेवाइकांनी कोणतीही तक्रार दिली नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस खान यांनी सांगितले.