परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्रातून (चष्म्यातून) पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे
संतांच्या वस्तूंविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक अन् संत, तसेच स्वतःच्या देहातील (केस, नखे, त्वचा यांच्याशी संबंधित) आणि त्यांच्या नियमित वापरातील वस्तूंमध्ये (कपडे, दैनंदिन वापरातील वस्तू इत्यादींमध्ये) साधनेमुळे होणार्या वैशिष्ट्यपूर्ण पालटांच्या संदर्भात विपुल संशोधन केले आहे. यामुळे अध्यात्मातील अनेक पैलू शिकायला मिळत आहेत. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अंशावतार आहेत’, असे सप्तर्षींनी नाडीपट्टीतून सांगितले आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संबंधित वस्तूंच्या संदर्भात करण्यात येणार्या संशोधनातून अध्यात्मातील अनेक नवीन पैलू उलगडत आहेत. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्रातून (चष्म्यातून) प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्रांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्रांमध्ये पुष्कळ चैतन्य असण्याचे कारण : परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदावरील समष्टी संत आहेत. त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वामुळे (चैतन्यामुळे) त्यांनी काही वर्षे वापरलेली उपनेत्रे चैतन्याने भारित झाली आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांसाठी वर्ष २०२१ मध्ये बनवलेले नवीन उपनेत्र त्यांनी नुसते घालून पहिल्यावर त्यातील (उपनेत्रातील) नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन त्यामध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने निर्माण झाली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण हे की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ५ टक्के विष्णुतत्त्व आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील विष्णुतत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले असल्याने त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्यात पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याच्या प्रभावाने त्यांचे नवीन उपनेत्र त्यांनी एकदाच थोडा वेळ घातल्यावर, म्हणजे अजून वापरायला प्रारंभ केलेला नसतांनाही त्यामध्ये एवढे चैतन्य निर्माण झाले आहे.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.७.२०२१)
ई-मेल : mav.research2014@gmail.com