तुळजापूर येथील श्रीविष्णु तीर्थ (मंकावती तीर्थकुंड) प्रकरणातील जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती !

(डावीकडे) देवानंद रोचकरी, (उजवीकडे) नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – शहरातील प्राचीन श्रीविष्णु तीर्थ (सध्या ‘मंकावती कुंड’ या नावाने प्रचलित आहे.) येथे अवैधरित्या बांधकाम केल्याच्या प्रकरणी भाजपचे नेते देवानंद रोचकरी यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याच्या जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाला नगरविकासमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. देवानंद रोचकरी यांनी या प्रकरणी मंत्र्यांकडे दाद मागितली असून त्यामध्ये स्वत:ला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, तसेच म्हणणे ऐकून न घेता निर्णय दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी आता नगरविकासमंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे.

प्राचीन श्रीविष्णु तीर्थ येथे अवैधरित्या बांधकाम करणार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी येथील दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांच्यासह महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकटअरण्य महाराज, संजयदादा सोनवणे, जनक कदम पाटील, सुदर्शन वाघमारे यांनी
३१ मे २०२१ या दिवशी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली होती.