राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ८.८.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

कोरोनाच्या काळात नाही, तर त्यापूर्वी साधना केली, तर रक्षण होऊ शकते, हे लक्षात ठेवा !

राजनाथ सिंह

‘कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले.’


पोलीस विभागातील गुन्हेगार पोलिसांना न ओळखणारे पोलीस समाजातील गुन्हेगारांना काय ओळखणार ?

‘वेर्णा (गोवा) पोलिसांनी मुरगाव तालुक्यातील हार्बर पोलीस ठाण्याशी निगडित पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांच्या विरोधात महिलेवर लैंगिक अत्याचार करणे आणि तिची फसवणूक करणे यांप्रकरणी गुन्हा प्रविष्ट केला आहे. मुरगाव येथील २७ वर्षीय महिलेने पिंगे यांनी लग्नाचे आमीष दाखवून डिसेंबर २०१९ मध्ये नाशिक येथे तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. ’
——————-

कुणी मुसलमान स्त्रियांना ‘बुरखा का घालायचा ? पुरुषांनी शुक्रवारी मशिदीत नमाजपठण का करायचे ? यांना कोणतेही वैज्ञानिक कारण नाही’, असे म्हणण्याचे धाडस दाखवतील का ?

अभिनेत्री सायली संजीव

‘प्रत्येक व्रतामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश न करण्याला कोणतेही वैज्ञानिक कारण नाही, असे वक्तव्य मराठी चित्रपट अभिनेत्री सायली संजीव यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त ‘चला व्रतवैकल्याकडे नव्या दृष्टीने पाहूया’, या विषयावर अभिनेत्री सायली संजीव यांचे ‘ऑनलाईन’ सार्वजनिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.’


देहलीमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या बांधण्यात आली मजार !

‘नवी देहली येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाली आहे, असे वृत्त ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.’


सनातनचे साधक याच्या दीड पटीने सेवा करतात आणि त्यांचे आरोग्य चांगले असते !

‘दीर्घकाळ काम करणार्‍या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका आणि ‘स्ट्रोक’ यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने तिच्या अहवालात म्हटले आहे. या अभ्यासानुसार वर्ष २०१६ मध्ये आठवड्याला न्यूनतम ५५ घंटे काम केल्याने ३ लाख ९८ सहस्र लोकांचा स्ट्रोकमुळे आणि ३ लाख ४७ सहस्र लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.’


हे सरकारला कळत कसे नाही ? कि सरकारी अधिकारीही या भ्रष्टाचारांत आहेत ?

‘सनातन धर्माच्या विरोधातील कार्य, तसेच देशाच्या विरोधातील कोणतेही कार्य विनामूल्य होत नाही. यामध्ये ‘रोख रक्कम, हवाला आणि काळे धन’ या ३ प्रकारच्या माध्यमातून हे धर्मांतर होते.’


काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना ‘हिंदूंचे लसीकरण न करणे’, ही शिक्षा योग्य आहे !

जय आहुजा

‘जोधपूरमध्ये (राजस्थान) काँग्रेसचे २ अल्पसंख्यांक आमदार आहेत. त्यांनी संघटित होऊन त्यांच्या मतदारसंघात विशेष कोविड केंद्राची उभारणी केली. तेथे येणार्‍यांना कोरोनावरील लस घेणे बंधनकारक केले आहे. राजस्थानमध्ये कितीतरी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांचे लसीकरण करण्यात आले; मात्र पाकिस्तानातील विस्थापित हिंदु शरणार्थींकडे ओळखपत्र आहे, पारपत्र (व्हिसा) आहे, तसेच ते घुसखोरी न करता वैध मार्गाने भारतात आले असतांना त्यांचे लसीकरण का होत नाही ? त्यांच्या जीवनाचे काहीच मोल नाही का ? हा कोणता निधर्मीवाद आहे ? त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात जावे लागणे, हे दुर्दैवच आहे, असे रोखठोक प्रतिपादन राजस्थान येथील ‘निमित्तेकम्’ या संघटनेचे अध्यक्ष श्री. जय आहुजा यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘कोरोना लसीकरणामध्ये ‘सेक्युलरवाद्यां’कडून हिंदू-मुसलमान भेद’, या ‘ऑनलाईन परिसंवादा’त ते बोलत होते.’