लव्ह जिहादविरोधी फतवा काढा !

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने ‘मुसलमान तरुणांनी मुसलमान समाजामध्येच विवाह करावा’, असे आवाहन केले आहे. इतकेच नव्हे, तर ‘मुसलमानेतर व्यक्तीशी केलेला विवाह इस्लामला अमान्य आहे’, असेही सांगितले आहे. काही मासांपूर्वीही असे आवाहन इस्लामी धर्मगुरूंनीही केले होते. लक्षावधी हिंदु तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर, त्यांच्या कुटुंबांना अतोनात क्लेश झाल्यावर आणि भारतातील राज्यांत लव्ह जिहादचे कायदे होऊ लागल्यावर हे शहाणपण या मंडळाला सुचले आहे. ही उपरती नव्हे, तर ‘हिंदू जागरूक होत असल्याने आणि कायदा प्रभावी होत असल्याने निर्माण झालेली अडचण आहे’, हे लक्षात घेतले पाहिजे. अजूनही बोर्डाने केवळ आवाहन केले आहे. इस्लाममध्ये मुसलमानेतराशी विवाहाला मान्यता नाही. त्यामुळे अन्य धर्मियांशी विवाह करण्याला बंदीच घालण्याचा फतवा बोर्ड का काढत नाही ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुसलमान तरुणांना स्वधर्मात विवाह करण्याचे आवाहन करणार्‍या या बोर्डाला गेली अनेक वर्षे निघत असलेले लव्ह जिहादचे फतवे ठाऊक नव्हते का ? हिंदु धर्मातील कुठल्या जातीतील मुलीला फसवले, तर अमुक रक्कम मिळेल, असेही फतवे काढले गेले. ते या बोर्डाला ठाऊक नव्हते का ? पूर्वी ‘लव्ह जिहाद’ हा शब्द वापरणार्‍याला ‘धर्मांध’ संबोधून त्याची मुस्कटदाबी केली जात होती. आता मात्र चित्र पालटले आहे. हिंदु समाज याविषयी जागृत होऊ लागला आहे आणि अशा प्रकरणांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करू लागला आहे. त्यामुळे इस्लामी संघटना भेदरल्या आहेत. भारताला इस्लामच्या छत्राखाली आणण्यासाठी धर्मांधांनी ‘लव्ह जिहाद’ हे हिंदूंच्या विरोधात उगारलेले शस्त्र होते. लव्ह ‘जिहाद हा हिंदूंच्या वंशविच्छेदाचा एक भाग आहे’, याची जाणीव हिंदूंना होऊ लागल्यामुळे हिंदू सजग झाले आहेत. एवढेच नव्हे, तर ते आता धर्मांधांना जाब विचारू लागले आहेत. भारतातील इस्लामी संघटना आणि या समाजातील कथित सुधारणावादी यांच्यावरही दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने अशा प्रकारचा फतवा काढून ‘आम्ही लव्ह जिहादसारख्या प्रकारांना थारा देत नाही’, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. वास्तविक असा फतवा काढण्याऐवजी बोर्ड मुसलमानांना हिंदु तरुणींना फसवून त्यांच्याशी निकाह करण्याचा सल्ला देणार्‍या इस्लामी धर्मगुरूंना उपदेशाचा डोस का पाजत नाही ? ‘हे कट्टर इस्लामी धर्मगुरु बोर्डाला भीक घालणार नाहीत’, हेही बोर्डाला ठाऊक आहे. त्यामुळे बोर्डात धारिष्ट्य असेल, तर त्याने ‘लव्ह जिहाद करणार्‍यांना शिक्षा करू’ असा फतवा काढावा अन्यथा बोर्डाचा ‘लव्ह जिहाद’ला छुपा पाठिंबा आहे, हेच सिद्ध होईल !