जुगार खेळणार्या ३ जणांवर गुन्हा नोंद
सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – शाहूपुरी पोलिसांनी श्री काशीविश्वेश्वर मंदिराजवळील टपरीवर धाड टाकून जुगार खेळणार्या ३ जणांना कह्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. यासीन इकबाल शेख, राम सुभाष पवार आणि राजा अशोक सांडगे यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून २ सहस्र ८० रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.