टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्रा यांना भालाफेकीमध्ये सुवर्णपदक !

टोकियो (जपान) – भारताच्या आतापर्यंतच्या ऑलिंपिकमधील सहभागाच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय खेळाडूने भालाफेकीमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. भारतीय खेळाडू नीरज चोप्रा यांनी ही कामगिरी केली आहे. नीरज चोप्रा हे भारतीय सैन्यदलामध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत आहेत. वर्ष २००८ च्या बीजिंग ऑलंपिक नंतर प्रथमच भारताला एखाद्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे. आताच्या सुवर्णपदाकासह भारताने टोकियो ऑलिंपिकमध्ये विविध क्रीडा प्रकारांत एकूण ७ पदके मिळवली आहेत.

व्हिडिओ सौजन्य : यू ट्यूब – सोनी स्पोर्ट्स इंडिया