‘बेस्ट बस’ आणि ‘लोकल’ यांच्या प्रवासासाठी एकच पास किंवा तिकिट यांचे नियोजन चालू ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – इलेक्ट्रिक बस प्रदूषण न करणारी आणि पर्यावरणपूरक आहे. वर्ष २०२१ पर्यंतचा बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. बेस्ट बस आणि लोकल प्रवास यांसाठी एकच पास किंवा तिकीट चालावे, याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. बेस्टच्या ७४ व्या दिनानिमित्त ७ ऑगस्ट या दिवशी माहिम येथील पुनर्विकसित बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते.