जयपूर येथे कानातच ब्लू-टूथ ईअरफोनचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू
जयपूर (राजस्थान) – येथील राकेश नागर या २८ वर्षीय तरुणाचा गाणे ऐकतांना कानातील ब्लू-टूथ ईअरफोनच्या दोन्ही ईअरबड्समध्ये स्फोट झाल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना चोमू भागातील उदयपुरिया गावातील आहे. देशात ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. आतापर्यंत भ्रमणभाष संच किंवा पॉवर बँक यांच्या स्फोटांत मृत्यूच्या घटना किंवा घायाळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
Bluetooth कान में लगाने से पहले हो जाओ सावधानhttps://t.co/Qm3j2jzXFj#Bluetooth #wireless #earphone
— ZEE Rajasthan (@zeerajasthan_) August 6, 2021
स्फोटामुळे राकेश नागर गंभीररित्या घायाळ झाल्यावर त्याच्या कानांतून रक्त येऊ लागले आणि तो बेशुद्ध होऊन भूमीवर कोसळला. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तरुणाला मृत घोषित केले. राकेशची तपासणी करणार्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ईअरबड्सचा स्फोट झाल्यानंतर संभाव्यत: हृदयविकाराच्या धक्क्यामुळे राकेशचा मृत्यू झाला असावा.