अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घातलेल्या तरुणीची तालिबान्यांकडून हत्या !
तथाकथित मानाधिकार संघटना, स्त्रीवादी संघटना आदी आता कुठे आहेत ?
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील बल्ख जिल्हा केंद्राकडे जाणार्या २१ वर्षीय नाजनीन या तरुणीला बुरखा न घातल्याने तालिबानी आतंकवाद्यांनी चारचाकीमधून बाहेर काढले आणि तिची गोळ्या झाडून हत्या केली. बल्ख हे उत्तरेतील अशांत क्षेत्र असून तेथे तालिबान अनेक भागांमध्ये सक्रीय आहे. मागील तालिबानी राजवटीत महिलांना त्यांचे शरीर आणि तोंडवळा बुरख्याने झाकावा लागत होता आणि त्यांना घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच व्यभिचाराचा आरोप असलेल्या महिलांना मैदानात उभे करून त्यांना दगड मारून ठार मारले जात होते.