कळणे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे ग्रामस्थांच्या झालेल्या हानीस उत्तरदायी असणारी खाण आस्थापने आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करा ! – सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे खनिज उत्खनन करण्यासाठी अनुमती दिलेली दोन्ही आस्थापने त्यांना अनुमती मिळालेल्या भूमीच्या व्यतिरिक्त अवैधरित्या उत्खनन करत आहेत. अवैध उत्खननामुळे कळणे डोंगराचा भाग कोसळल्यानंतर खाणीतील खनिजयुक्त पाणी आणि माती गावातील नागरिकांची घरे, शेती आणि बागायती यांमध्ये घुसून हानी झाली आहे. त्यामुळे हानीग्रस्त नागरिकांना संबंधित आस्थापनांकडून अधिकाधिक हानीभरपाई देण्यात यावी, तसेच या घटनेस उत्तरदायी असलेली खाण आस्थापने आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग’चे अध्यक्ष रत्नकांत कदम यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.