पोलंडच्या वॉर्सा विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आले आहेत उपनिषदातील संस्कृत श्लोक !
|
नवी देहली – सामाजिक माध्यमांतून एक छायाचित्र प्रसारित होत आहे. यामध्ये पोलंडच्या वॉर्सा विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या बाहेरील भिंतीवर उपनिषदामधील संस्कृत भाषेतील श्लोक लिहिण्यात आल्याचे दिसत आहे. पोलंडमधील भारतीय दूतावासाने ट्वीट करून याची माहिती देतांना लिहिले आहे, ‘किती सुंदर दृश्य आहे. उपनिषद हिंदु धर्माचा आधार असणार्या वैदिक संस्कृतचे मूळ आहे.’
What a pleasant sight !!😇 This is a wall of Warsaw University’s library with Upanishads engraved on it. Upanishads are late vedic Sanskrit texts of Hindu philosophy which form the foundations of Hinduism. 🙏🙏@MEAIndia pic.twitter.com/4fWLlBUAdX
— India in Poland (@IndiainPoland) July 9, 2021
सामाजिक माध्यमांतून यावर अनेकांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. एकाने म्हटले की, जेव्हा जगभरात हिंदु धर्माचा स्वीकार करण्यात येत आहे, त्या वेळी आम्ही मात्र पाश्चात्त्य संस्कृतीकडे आकर्षित होत आहोत.