देहलीमध्ये अवैधरित्या रहात आहेत १०० हून अधिक नायजेरियातील नागरिक !
नायजेरियाच्या नागरिकांकडून ऑनलाईन व्यवहाराद्वारे भारतियांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
राजधानी देहलीमध्येच अशी स्थिती असेल, तर देशातील अन्य ठिकाणी काय स्थिती असेल, याची कल्पना करता येईल ! अवैधरित्या भारतात राहून भारतियांची फसवणूक करेपर्यंत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? – संपादक
नवी देहली – देहलीमध्ये १०० हून अधिक नायजेरियातील नागरिक अवैधरित्या रहात आहेत. यांतील काही जण वैद्यकीय, पर्यटन आदी व्हिसा घेऊन (प्रवेश परवाना घेऊन) भारतात आले होते आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते देहलीमध्ये रहात आहेत. ते देशभरातील लोकांची ऑनलाईन व्यवहाराद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत आहेत. पोलिसांनी त्यांची माहिती गोळा केली आहे. यांतील ओकुरिवामा मोसिस याला अटकही करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून फसवणुकीविषयी माहिती मिळाली आहे.
#Delhi में मिले 100 से ज्यादा #Nigerian ठग, बिना वीजा के डेरा जमाए कर रहे साइबर ठगी, ऐसे हुआ खुलासा#latestnews https://t.co/3pcJ6g0cTN
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) August 6, 2021
मोसिस याची मैत्रिण मेंडी ही कानपूर येथून त्याला साहाय्य करत आहे. ‘तिला लवकरच अटक करण्यात येईल’, असे पोलिसांनी सांगितले. नायजेरियाचे हे आरोपी भारतात चालू स्थितीतील सिम कार्डचा वापर करून त्याद्वारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेमध्ये खाते उघडतात आणि त्याद्वारे फसवणूक करत होते.