कासार्डे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे साडेचार लाख रुपयांचे मद्य पोलिसांच्या कह्यात !
कणकवली – तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका बोलेरोमधून साडेचार लाख रुपये मूल्याचे गोवा बनावटीचे मद्य कह्यात घेतले. या प्रकरणी नगर जिल्ह्यातील सानपवस्ती येथील बोलेरो चालक सागर सानप याला अटक करण्यात आली. (गोवा बनावटीचे मद्य गोव्यातून कणकवली तालुक्यापर्यंत पोचेपर्यंत एकाही तपासनाक्याला हे मद्य सापडले नाही कसे ? – संपादक)