परदेशात नोकरी लावण्याचे आमीष दाखवून फसवणार्‍या आणि वर्ष २००५ पासून पसार असणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

गुन्हेगारीतही पुढे असलेल्या धर्मांध महिला देशासाठी चिंताजनक ! अशा महिलांना कठोर शिक्षा त्वरित होणे अपेक्षित आहे. – संपादक 

पुणे, ५ ऑगस्ट – परदेशात नोकरी लावण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक करणार्‍या आणि वर्ष २००५ पासून पसार असणार्‍या राहत तालीबअली सय्यद उपाख्य अलका शर्मा या महिलेला विमाननगर (पुणे) येथून अनुमाने १६ वर्षांनी अटक करण्यात आली. ती विमाननगर भागात नाव बदलून रहात होती. तिच्यावर नजर ठेवत विमाननगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चौकशीत तिने फसवणुकीच्या गुन्ह्यांची स्वीकृती दिली.

वर्ष २००५ मध्ये परदेशात नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणूक केल्याप्रकरणी अबिदअली सैय्यद, अब्दुलवहाब मुजावर, राहत सैय्यद यांच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याविषयी ज्ञानेश्वर जमदाडे यांनी तक्रार दिली होती. परदेशात नोकरीच्या आमीषाने जमदाडे, त्यांचे मित्र सुरेश रक्ती यांच्यासह अनेकांची फसवणूक करण्यात आली होती.