कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि पुणे या जिल्ह्यांत लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई – राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या ४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यांत शोध घेणे, चाचणी आणि उपचार करणे या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जात आहे. या जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची सूचना प्रशासकीय अधिकार्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. ज्या देशांमध्ये लसीकरण अधिक झाले, तेथे कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संसर्ग न्यून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. लस पुरवठ्यासाठी अखंडितपणे चालू रहावा, यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.’’